• #341 (no title)
  • Contact
  • Full-Width Page
  • Goa
  • Goa-old
  • Home
  • Latest News
  • Lost Password
  • Meet The Team
  • Our Story
  • Polls Archive
  • Register
  • Typography
  • फोरम

गोवा खबर

गोवा खबर

गोव्याचा दहावीचा निकाल 92.75 टक्के;मुलींची बाजी

Published

4 years ago

on

June 2, 2022

By

Devendra Walavalkar
Spread the love
गोवा खबर:गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त मंडळाने यंदा  घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 92.75 टक्के इतका लागला आहे.  यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली.
या परीक्षेस ९,९८६ विद्यार्थिनी बसल्या होत्या. पैकी ९,३७८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ही टक्केवारी ९३.९१ टक्के इतकी आहे.
खाजगी विद्यालयांतील विद्यार्थ्यांचा निकाल ३६.८४ टक्के, आयटीआय विद्यार्थ्यांचा निकाल ६७.५७ टक्के आणि पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ३४.२१ टक्के लागला आहे.
यंदाची दहावीची परीक्षा ३१ केंद्रे आणि १७३ उपकेंद्रांवर घेण्यात आली. एकूण २०,३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १९,८६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या परीक्षेला एकूण १०,३५९ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९,४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९१.६२ इतकी आहे.
फेरमूल्यांकनासाठी १० जूनपर्वी अर्ज करावा लागणार असून त्यासाठी ३५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी प्रत्येक विषयासाठी ७०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून आहे. गैरहजेरीत फेरमूल्यांकन करण्यासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दहावीचा निकाल जाहीर केला. हा निकाल पहिल्यांदाच दोन सत्र परीक्षांच्या आधारावर जाहीर करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षातही अशाच पद्धतीने निकाल दिला जाणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. विद्यालयांच्या पोर्टलवर उद्या ३ जूनपासून गुणपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा असेल. पुरवणी परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. गुणपत्रिकेसाठी विद्यार्थी किंवा पालकांना मंडळाच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक विद्यालयात ती उपलब्ध असेल, असेही शेट्ये यांनी यावेळी सांगितले.
 खुल्या गटातील विद्यार्थ्यांचा निकाल ९२.१८ टक्के, ओबीसींचा निकाल ९५.४७ टक्के, एससीचा निकाल ९०.१८ टक्के तर एसटीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ९३.३९ टक्के लागला.
धारबांदोडा तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६.४४ टक्के तर, काणकोण तालुक्याचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ८८.२७ टक्के इतका लागला आहे.

Related Topics:Featured

Trending

  • इंग्लिश खबर2 days ago

    PIB Organises Press Tour for Journalists from Maharashtra’s Aspirational Districts to ICAR-IARI

  • इंग्लिश खबर1 week ago

    Jaibir Singh Kang clinches A&B title as Roundglass athletes deliver a double at IGU Junior Boys C’ship

  • इंग्लिश खबर4 days ago

    GUJ to organise Solo Singing Competition on Aug 29

  • इंग्लिश खबर5 days ago

    ‘Goa Through Sketches’ brings Goa’s everyday stories to life at Aguad Port & Jail Complex

  • इंग्लिश खबर1 week ago

    Goa sees 6.14 million Visitors in the First Seven Months of 2026

  • इंग्लिश खबर1 week ago

    Shameemudheen, most expensive player at ₹20 lakh in Prime Volleyball League(PVL) auction

Copyright © 2017-2023 Goa Khabar. Developed by Rs999 Web Services

Exit mobile version