गोवा खबर

मान्सूनपूर्वी तार नदीचे गाल उपसण्याचे काम करा:जलस्त्रोतमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर:जलस्त्रोत मंत्री  सुभाष शिरोडकर यांनी आज म्हापसा येथे भेट देऊन तार नदीच्या परिसराची पाहणी केली.

यावेळी आमदार श्री जोशुआ डिसोझा व बस्तोडाचे सरपंच श्री रणजित उसगावकर उपस्थित होते.

शेतकरी व स्थानिकांशी संवाद साधत मंत्र्यांनी तार नदीतील गाळ उपसण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे आश्वासन दिले व बस्तोडा व मयडे येथील शेतकऱ्यांना म्हापसा येथील काम पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही गावांतील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात येईल असे सांगितले. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यातील पाच प्रमुख तलावांचे गाळ उपसण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

Trending

Exit mobile version