गोवा खबर

गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 92.66 टक्के;यंदाही मुलींची बाजी

Published

on

Spread the love
गोवा खबर:गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 92.66 टक्के लागला आहे. गोवा बोर्डाचा बारावीचा आज निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 90.66 टक्के मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे.
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेट्ये यांनी आज निकाल जाहिर केला.निकाल  https://www.gbshse.info या अधिकृत वेबसाईटवर जाहिर करण्यात आला आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल 95.71 टक्के, कला शाखेचा 95.68 टक्के, विज्ञान शाखेचा 93.95 टक्के निकाल लागला आहे. त्याचबरोबर व्यावसायिक शाखेतून 79.04 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या वर्षी गोवा बोर्डाची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.40 टक्के होती. एकूण 18,201 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये 18,201 विद्यार्थ्यांपैकी 16,783 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे.

Trending

Exit mobile version