गोवा खबर

दरबार हॉलमध्ये प्रकाश परब उत्सवाला राज्यपालांची उपस्थिती

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी काल शिखांचे ९ वे गुरू साहेब श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ४०० व्या प्रकाश परब सोहळ्याला हजेरी लावली. दरबार हॉल राजभवन येथे गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा, बेती, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना राज्यपालांनी गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील शीख समाजाच्या योगदानाचे स्मरण केले. आणि कर्नल सिंग यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकला.

राज्यपाल म्हणाले शिखांचे ९ वे गुरू साहेब श्री गुरु तेग बहादूरजी यांचा ४०० वा प्रकाश परब संपूर्ण देश साजरा करीत आहे. ते म्हणाले भारतीय त्यांचा आदर करीत आहेत. राज्यपाल पुढे म्हणाले की शीख समाज हे कष्टकरी लोक आहेत आणि त्यांच्या कामात ते नेहमीच व्यस्त असतात आणि राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी लोकांना सर्व धर्मांचा आदर करण्याचे आवाहन केले कारण यामुळे लोकांमध्ये जातीय सलोखा, एकता आणि सौहार्द निर्माण होतो असे ते म्हणाले.

कीर्तन दरबार नंतर गुरुमत समागम सादर करणारे भाई साहिब चमनजीत सिंगजी लाल यांच्या उपस्थितीने उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान राज्यपालांचा गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा, बेती, गोवा आणि सभोवतालच्या अकरा राज्यांच्या असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या वतीने सत्कार करण्यात आला. पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली.

Trending

Exit mobile version