गोवा खबर

बारावीचा निकाल 21 मे रोजी

Published

on

Spread the love
गोवा खबर:उच्च माध्यमिक मंडळाचा बारावीचा निकाल येत्या शनिवार 21 मे रोजी  लागणार आहे. 21 रोजी संध्याकाळी 5 वाजता https://www.gbshse.info या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहिर केला जाणार आहे.बारावीच्या परीक्षेत 18,215 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,937 मुले आणि 9,278 मुली होत्या.
गोव्यातील 106 उच्च माध्यमिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये वाणिज्य शाखेसाठी 5,502 विद्यार्थ्यांनी, विज्ञान शाखेसाठी 5,080, कला शाखेसाठी 4,757 आणि व्यावसायिक शाखेसाठी  2,876 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
2021 चा बाराविचा निकल 99.40 टक्के इतका लागला होता. दरम्यान यावर्षी निकालाची टक्केवारी वाढण्याची आशा मंडळाला आहे.

Trending

Exit mobile version