गोवा खबर:दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्यावतीने १९ आणि २६ मे २०२२ रोजी मांडवी नदीत पणजीतील मच्छिमारी जेटीजवळ आणि जुवारी नदीत बोरी पुलाच्या खालील बाजुने नदीच्या भागात, २० आणि २५ मे २०२२ रोजी तेरेखोल नदीत आरोंदा पुलाच्या खालील बाजुच्या नदीच्या भागात आणि शापोरा नदीत कोलवाळ-धारगळ पुलाच्या खालील बाजुच्या नदीच्या भागात जल प्रवाहाचा अभ्यास करण्यात येईल.
त्यासाठी वरील नदीतून वाहतूक करणाऱ्या सर्व बार्जेस, प्रवासी लाँच, क्रुईज बोटी, जलक्रिडा बोटी, लहान बोटी, फेरीबोटीं, मच्छिमारी बोटीं, आणि इतर यांत्रिकीं आणि बिनयांत्रिकीं नाविकांनी वरील दिवशी खबरदारी घेवून सावकाश वाहतूक करावी. तसेच गस्त बोटीकडून मिळणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे बंदर खात्याने कळविले आहे.