गोवा खबर

राज्यपालांनी पंचायतींच्या समस्या जाणून घेतल्या, जुने गोवा चर्चला भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर: राज्यपाल  पी एस श्रीधरन पिल्लई यांनी जुने गोवा, खोर्ली आणि कुंभारजुवा येथील ग्रामपंचायतींच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संवाद साधताना गोव्यातील लोक सुखी व्हावेत अशी त्यांची इच्छा असल्याचे सांगितले. मिझोरामचे राज्यपाल असतानाच्या त्यांच्या दिवसांची आठवण करून देताना ते म्हणाले की मिझोराम खूप गरीब असले तरी आनंदाच्या सूचित ते पहिल्या क्रमांकावर आहे. ते पुढे म्हणाले की गोव्यात दरडोई उत्पन्न हे आनंदाच्या सूचित उच्च असूनही ते इतर राज्यांपेक्षा खूप खाली आहे.

या गावांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या वाहतूक, रोजगार, पायाभूत सुविधा अशा समस्या जाणून घेऊन त्यांनी समस्यांकडे संबंधित खात्यांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले.

निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी भारताचे वास्तविक जीवन खेड्यात असल्याचे सांगितले त्यामुळे मी गोव्यातील गावांना भेटी देत असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधींनीही ग्राम स्वराज्याचे समर्थन केले होते असे ते म्हणाले .

यावेळी राज्यपालांनी डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीचे वितरण केले. गरजू लोकांना मदत करण्यासाठी राजभवन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. देश कल्याणकारी राज्य असावे असे भारतीय राज्यघटनेत लिहिलेले आहे असेही ते म्हणाले. लोकशाहीत जनता ही सर्वोच्च असते आणि आम्ही जनतेची कटीबद्ध सेवा करण्याचा संकल्प करतो असे ते म्हणाले.

यावेळी कुंभारजुवाचे आमदार श्री राजेश फळदेसाई , पुरातत्व, नदी परिवहन  आणि समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई, राज्यपालांचे सचिव श्री मिहीर वर्धन, आयएएस, जुने गोवा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती जनिता मडकईकर, कुंभारजुवा ग्रामपंचायतीच्या सरपंच, बिंदी परब, उपसरपंच शिवा नाईक, उपजिल्हाधिकारी श्री चंद्रकांत शेटकर, तिसवाडीचे मामलेदार श्री दशरथ गावस, पंच सदस्य व इतर उपस्थित होते.

     कुंभारजुवाचे आमदार, श्री राजेश फळदेसाई यांनी राज्यपालांनी गोव्याच्या गावांना भेटी दिल्या आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्याचे सांगितले. पुरातत्त्व, नदी परिवहन व समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी मतदारसंघातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला आणि त्यांना सरकारकडून सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

तद्नंतर राज्यपालांनी से कॅथेड्रल चर्च आणि ओल्ड गोवा चर्च संकुलाला भेट दिली. से कॅथेड्रलचे पॅरिश प्रिस्ट, फादर रोझारियो ऑलिव्हेरा यांनी राज्यपालांना तेथील विविध धार्मिक महत्त्वाची ठिकाणे दाखविली. यावेळी केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक हेही उपस्थित होते.

Trending

Exit mobile version