गोवा खबर

पेन्शन आणि लॅपटॉप/कॅमेरा योजनेचा लाभ घेण्याचे पत्रकारांना आवाहन

Published

on

Spread the love

 गोवा खबर: माहिती आणि प्रसिध्दी खात्याने गोवा राज्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी दोन योजना अधिसूचित केल्या आहेत. खात्याने ‘गोवा राज्य कार्यरत पत्रकार कल्याण योजना’ तसेच ‘पत्रकारांसाठी लॅपटॉप/कॅमेरा खरेदी मदत योजना अधिसूचित केली आहे.

गोवा राज्य कार्यरत पत्रकार कल्याण योजना ही अगोदरच्या गोवा राज्य पत्रकार कार्यरत कल्याण योजना नियम २००२ ची सुधारणा करून  अधिसूचित केली आहे. या योजनंअंतर्गत पत्रकार त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी पात्र आहेत. जे लाभार्थी या योजनेअंतर्गत आधीच लाभ घेत आहेत ते या योजनेत नावनोंदणी करू शकतात आणि त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

आत्तापर्यंत ५५ लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार, लाभार्थींना निवृत्ती वेतन ७५०० वरून ८५०० रुपये आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना एप्रिल २०२२ पासून ५० टक्के पेन्शन मिळेल.

 कोणताही पत्रकार १५ वर्षे गोव्यातील रहिवाशी आहे आणि गोव्यातील वृत्तपत्र किंवा माध्यम अस्थापनात १८ वर्षे सेवा बजाविल्यानंतर सेवानिवृत्त झालेला पत्रकार वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यापूर्वीच्या योजनेचा लाभ घेतलेले पत्रकार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाहीत.

 जे पत्रकार कमीत कमी ८ वर्षे पूर्णवेळ पत्रकार आहेत आणि इतर कोणतेही काम करीत नाही  फक्त पत्रकारीता करून  उपजीविका चालवितात अशा पत्रकारांसाठी  लॅपटॉप/कॅमेरा खरेदी मदत योजना खात्याने सुरू केली आहे..

ज्यांना दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आवश्यक फॉर्म माहिती आणि प्रसिध्दी खात्याकडे सादर करावा लागेल.

Trending

Exit mobile version