गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. ईद म्हणजे मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देण्याची आणि गरजू लोकांचे जीवनमान सुधारण्याची संधी आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात.
आपल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी समाज, राज्य आणि देशाच्या हितासाठी काम करण्याचे लोकांना आवाहन केले आहे. या दिवशी आपण मानवतेच्या सेवेसाठी स्वत:ला झोकून देऊया, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.