गोवा खबर

२७ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिवस

Published

on

Spread the love

 

 

 

गोवा खबर:कृष्णदास शामा गोवा राज्य मध्यवर्ती वाचनालय २७ एप्रिल २०२२ रोजी पाटो, पणजी येथील संस्कृती भवनातील बहुउद्देशीय सभागृहात विविध उपक्रमांसह जागतिक पुस्तक दिन साजरा करणार आहे. उद्घाटन सकाळी १० वाजता होईल.

यावेळी कॉर्पोरेट ट्रेनर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रवीण सबनीस, कला आणि संस्कृती संचालक श्री. सगुण वेळीप, उप संचालक आणि क्युरेटर श्री. अशोक परब, सहाय्यक राज्य ग्रंथपाल श्रीमती सुलक्षा कोळमुळे, ग्रंथपाल इतर अधिकारी उपस्थित राहतील.

गोव्यात २०२०-२१ या वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. सबनीस करतील आणि त्यांचे भाषण होईल आणि त्यानंतर उपस्थितांशी ते संवाद साधतील.

एनजीओ आणि पंचायत ग्रंथालयांशी संबंधित विषयावर संध्याकाळच्या सत्रात क्युरेटर, प्रभारी, सहाय्यक राज्य ग्रंथपाल आणि इतर ग्रंथपालांशी चर्चा केली जाईल.

या कार्यक्रमास ग्रंथप्रेमी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version