गोवा खबर: एला धावजी-ओल्ड गोवा येथील मच्छिमारी प्रशिक्षण केंद्रात मत्स्योद्योग संचालनालयातर्फे १ जून २०२२ पासून सुरू होत असलेल्या सहा महिने कालावधीच्या मच्छिमार प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले आहेत.
हस्तकला आणि गीअर्सचे प्रशिक्षण, फंडामेंटल ऑफ नेव्हिगेशन आणि सीमनशिप, देखभाल आणि ऑपरेशन ऑफ मरीन डिझेल इंजिन, आधुनिक जाळ्यांची विणकाम आणि दुरुस्ती, सी फूड मूल्यवर्धन विपणन, मत्स्यपालन, मत्स्यालय बनविणे आणि जलतरण अशा वर्गामध्ये प्रशिक्षण देण्यात येईल.
उमेदवार किमान आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेला असावा. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार प्रवेशासाठी पात्र आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल तसेच समुद्राचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य असेल. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना १ हजार रुपये विध्यावेतन व महागाई भत्ता देण्यात येईल
अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख १६ मे २०२२ अशी आहे.
इच्छुक उमेदवारांनी मच्छिमार प्रशिक्षण केंद्र, एला धावजी जुने गोवा किंवा पणजीतील मत्स्योद्योग संचालनालयाच्या मुख्य कार्यालयात संपर्क साधावा. अर्ज आणि इतर माहितीसाठी लँडलाइन क्रमांक (०८३२) २२२४८३८ वर संपर्क साधू शकता किंवा अधिक माहितीसाठी www.fisheries.goa.gov या वेबसाइटला भेट द्यावी