गोवा खबर

57 व्या इफ्फीमध्ये तियागो तियागो गुएदेस यांच्या ‘अकी’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार

Published

on

Spread the love


बेभरवशाच्या, स्वप्नवत विश्वात आपलेपणाची प्रगाढ जाणीव निर्माण करण्याच्या चित्रपटाच्या क्षमतेची ज्युरींकडून प्रशंसा

गोवा खबर:तियागो गुएदेस दिग्दर्शित आणि पाउलो ब्रान्को निर्मित ‘अकी’ हा पोर्तुगीज-फ्रेंच चित्रपट 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या “सुवर्ण मयूर” या सर्वोच्च पुरस्काराचा विजेता ठरला. गोव्यात झालेल्या महोत्सवाच्या समारोप समारंभात दिग्दर्शक तियागो गुएदेस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि परीक्षक मंडळाचे (ज्युरी) अध्यक्ष आनंद एल. राय यांनी संयुक्तपणे हा पुरस्कार प्रदान केला.

मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 15 चित्रपटांमधून विजेता म्हणून 204 मिनिटांच्या या सह-निर्मितीपटाने बाजी मारली. मे 2026 मध्ये कान चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाल्यानंतर, हा चित्रपट साओ पावलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि जकार्ता चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला; त्यानंतर ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार पटकावल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवी प्रवासात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मनाला सुखावणारी मात्र पुढे काय होईल यांचा अंदाज बांधता न येणारी अशी बांधीव कथा असलेल्या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल परीक्षकांनी या चित्रपटांची विशेष दखल घेतली. या चित्रपटातील प्रमुख अभिनेते दिवंगत मानोलो सोलो यांना, त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल  यावेळी आदरांजली  वाहण्यात आली.

“हा चित्रपट आपल्याला एका सुखद आणि स्वप्नवत विश्वात घेऊन जातो. या  विश्वात अनपेक्षित आणि अनाकलनीय घडामोडी घडतात, परंतु त्याचवेळी त्या आपल्याच बाबतीत घडतात असे वाटते आणि त्यातून बाहेर पडण्याची आपल्याला इच्छाच होत नाही. या चित्रपटातील प्रमुख अभिनेते, दिवंगत मनोलो सोलो यांचा सन्मान करण्याचे परीक्षक मंडळाने ठरवले आहे. त्यांचे  कलात्मक योगदान सदैव स्मरणात राहील ” असे परीक्षक मंडळाने नमूद केले.

मुख्य प्रवाहातील आंतरराष्ट्रीय चित्रपट या श्रेणीअंतर्गत, स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रपट कलाकृतीला  सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सूवर्ण मयूर पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप 51 लाख रुपये रोख इतके असून, ही रक्कम दिग्दर्शक आणि निर्मात्यामध्ये समप्रमाणात वितरित करण्यात येते. दिग्दर्शकाला ‘सूवर्ण मयूर’ सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाते, तर निर्मात्याला प्रमाणपत्र मिळते. याशिवाय, दोघांनाही रोख पारितोषिकातील आपापला समान वाटा मिळतो.

‘आकी‘ चित्रपटाविषयी..

ह्या चित्रपटात असे एक विश्व साकारले आहे, ज्यात लोक आपल्या भूतकाळातील आठवणींशिवाय नव्याने जीवन सुरू करतात, त्या जगात सिमॉन एका लहान मुलाला, डेव्हिडला, सांभाळत असतो.  या मुलाला आईची गरज आहे, असा त्याचा ठाम विश्वास असतो. त्यामुळे तो इनेसला शोधतो आणि हळूहळू हे तिघे मिळून एका वेगळ्या कुटुंबाची निर्मिती करतात.

डेव्हिडची जिज्ञासू वृत्ती आणि स्वतंत्र विचार असतात, त्यामुळे, साचेबद्ध जगण्याची अपेक्षा करणाऱ्या समाजाशी त्याचा संघर्ष होत राहतो. अशा परिस्थितीत सिमॉन आणि इनेस यांना पालकत्वातील अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागतो आणि मुलाचे वेगळेपण स्वीकारण्यासही शिकावे लागते.

https://platform.twitter.com/embed/Tweet.html?dnt=false&embedId=twitter-widget-0&features=eyJ0ZndfdGltZWxpbmVfbGlzdCI6eyJidWNrZXQiOltdLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X2ZvbGxvd2VyX2NvdW50X3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9iYWNrZW5kIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19yZWZzcmNfc2Vzc2lvbiI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZm9zbnJfc29mdF9pbnRlcnZlbnRpb25zX2VuYWJsZWQiOnsiYnVja2V0Ijoib24iLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X21peGVkX21lZGlhXzE1ODk3Ijp7ImJ1Y2tldCI6InRyZWF0bWVudCIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZXhwZXJpbWVudHNfY29va2llX2V4cGlyYXRpb24iOnsiYnVja2V0IjoxMjA5NjAwLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X3Nob3dfYmlyZHdhdGNoX3Bpdm90c19lbmFibGVkIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19kdXBsaWNhdGVfc2NyaWJlc190b19zZXR0aW5ncyI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdXNlX3Byb2ZpbGVfaW1hZ2Vfc2hhcGVfZW5hYmxlZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdmlkZW9faGxzX2R5bmFtaWNfbWFuaWZlc3RzXzE1MDgyIjp7ImJ1Y2tldCI6InRydWVfYml0cmF0ZSIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfbGVnYWN5X3RpbWVsaW5lX3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9mcm9udGVuZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9fQ%3D%3D&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=2126682401489424706&lang=en&origin=https%3A%2F%2Fwww.pib.gov.in%2FPressReleasePage.aspx%3FPRID%3D2343295%26reg%3D1%26lang%3D9&sessionId=4e8c7be2bf010fda7715aa2a750a67732fe7e782&theme=light&widgetsVersion=6a3ad42b224df%3A1778106238597&width=550px

‘आकी‘ चित्रपटाची चमू असलेली पत्रपरिषद बघण्यासाठी इथे क्लिक करा:

Trending

Exit mobile version