गोवा खबर

त्रिपुरारी पौर्णिमा राज्यस्तरीय नौका स्पर्धेचे निकाल

Published

on

Spread the love

गोवा खबर:”त्रिपुरारी पौर्णिमा” विठ्ठलापूर, सांखळी येथील श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरात, वाळवंटी नदीच्या काठावर राज्य उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाचे आयोजन कला व संस्कृती संचालनालयाने पर्यटन खाते, गोवा पर्यटन विकास महामंडळ, माहिती व प्रसिद्धी खाते, दीपावली उत्सव समिती आणि श्री देव विठ्ठल पंचायतन देवस्थान, विठ्ठलापूर सांखळी यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाळवंटी नदीच्या खोऱ्यात आयोजित केलेली नेत्रदीपक नौका स्पर्धा होती. कला आणि संस्कृती संचालनालयाने प्रायोजित केलेल्या या नौकानयन स्पर्धेत, राज्याच्या विविध भागांतील सहभागींनी डिझाइन केलेल्या एकूण ४२ बोटींनी भाग घेतला होता. सात हजारांहून अधिक प्रेक्षकांनी या भव्य पारंपरिक महोत्सवाचा अनुभव घेतला. या बोटी हस्तनिर्मित आणि अत्यंत बारकाईने डिझाइन केलेल्या होत्या ज्याव्दारे राज्यातील तरुण कलाकारांची सर्जनशीलता आणि प्रतिभा दिसून आली.

       नौका स्पर्धेव्यतिरिक्त श्री देव विठ्ठलांचा संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. नदीतील दीपदान, भगवान श्रीकृष्ण आणि विठ्ठल-रखुमाई यांची मिरवणूक, आकाशात पारंपरिक ‘सारंग’ सोडणे, त्रिपुरासुराच्या पुतळ्याचे दहन, दशावतारी नाटकाचे सादरीकरण ही या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

       या महोत्सवाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटे, मयेचे आमदार श्री. प्रेमेंद्र शेट, कला आणि संस्कृती संचालक श्री. विवेक कृष्ण नाईक, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुलदीप आरोलकर आणि इतर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या महोत्सवासाठी विविध सरकारी खात्यांचे अधिकारीही उपस्थित होते.

       राज्यस्तरीय नौका स्पर्धेचे परीक्षण गोवा कला महाविद्यालयाने नियुक्त केलेल्या श्री. सागर गावडे, श्री. सजय चंद्रशेखर आणि श्री. राजेश चोडणकर या परीक्षक मंडळाने केले.

       नौकानयन स्पर्धेचा निकाल परीक्षकांकडून जाहीर केला जातो. पारितोषिके एका वेगळ्या कार्यक्रमात वितरित केली जातील आणि स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख व ठिकाण नंतर कळविले जाईल.

 कलयुगी, भूमी, तालखंबेश्वर, श्री भूतनाथ बॉईज, ब्राह्मणी यांनी अनुक्रमे पहिले ते पाचवे बक्षिस पटकाविले. पाच उत्तेजनार्थ पारितोषिके आणि एक मानधन जाहीर करण्यात आले. उर्वरित सहभागींना सहभाग भत्ता देण्यात आला.

Trending

Exit mobile version