सीमा ओलांडणाऱ्या कथा मुद्रित आणि आणि डिजिटल स्वरूपात सादर करण्यासाठी 57 व्या इफ्फी (IFFI) मध्ये इफ्फीलॉंइड (IFFILOID) चे पुनरागमन
न्यूजलेटर महोत्सवातील ठळक घडामोडी, चित्रपटविषयक संवाद आणि पडद्यामागचे क्षण टिपणार
गोवा खबर:गोवा येथे 57 इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुरुवातीबरोबरच महोत्सवाचे संचालक, ख्यातनाम चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी आज ‘इफ्फीलॉंइड’ (IFFILOID) या न्यूजलेटरचे, म्हणजेच दैनिक वृत्तपत्रिकेच्या खंड 5, अंक 1 चे प्रकाशन केले. ‘इफ्फीलॉंइड हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रसूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) प्रकाशित केले जाणारे महोत्सवाचे दैनिक वृत्तपत्र आहे.
यंदाच्या इफ्फी मध्ये वाचकांना सिनेमाच्या चैतन्यमय जगाची अनुभूती देण्यासाठी, आणि चित्रपट, चित्रपट निर्माते, संवाद आणि संस्मरणीय क्षणांची ताजी माहिती देऊन महोत्सवातल्या कथाकथनाचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहे.
या न्यूजलेटरमध्ये महत्त्वाचे क्षण, रंजक लेख, छायाचित्रे, कार्यक्रमांचे वेळापत्रक आणि प्रमुख घडामोडींविषयीची अद्ययावत माहिती दिली जाईल. न्यूजलेटर, चित्रपट प्रदर्शन, आणि चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधण्यापासून, ते चित्रपटांचे खेळ, आणि महोत्सवातील इतर उपक्रमांपर्यंत, महोत्सवातील घटनांचा प्रत्यक्ष अनुभव टिपेल.
‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’, ही 57 व्या इफ्फी (IFFI) ची संकल्पना प्रतिबिंबित करणारे हे न्यूजलेटर, लोक, संस्कृती आणि दृष्टिकोन यांना जोडणाऱ्या चित्रपटसृष्टीच्या सामर्थ्याचा गौरव करते. महोत्सवाला त्याच्या प्रदर्शन स्थळांपलीकडे नेऊन, चित्रपटप्रेमी आणि वाचकांना इफ्फी (IFFI) मधील ताज्या घडामोडींशी जोडून ठेवणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
20 ते 29 नोव्हेंबर दरम्यान, महोत्सवाच्या कालावधीत दररोज प्रकाशित होणारे ‘इफ्फीलॉंइड (IFFILOID) हे न्यूजलेटर, इफ्फी महोत्सवातील पीआयबी च्या अधिकृत वार्तांकनाला पूरक ठरत असून, ते महोत्सवातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाचे क्षण सुलभ दृश्यात्मक स्वरूपात सादर करेल.
इफ्फीलॉंइड (IFFILOID) चा पहिला अंक PIB IFFI च्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. वाचकांना ताज्या आवृत्त्या वाचता येतील.