गोवा खबर

संस्थांअंतर्गत स्वच्छता करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची विशेष मोहीम -6 यशस्‍वी

Published

on

Spread the love


मोहिमेअंतर्गत विविध निकषांखालील उद्दिष्टांची 100 टक्क्यांहून अधिक पूर्तता, 4,960 पेक्षा अधिक ठिकाणी स्वच्छता आणि साफसफाईचे राबवले उपक्रम

गोवा खबर:रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच त्याच्या अधिपत्याखालील संस्थांनी प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम 6 यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही मोहीम 2 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान मंत्रालयाने विविध निकषांखाली निश्चित केलेल्या उद्दिष्टांची 100 टक्क्यांहून अधिक पूर्तता केली. यामध्ये सार्वजनिक तक्रारींचा निपटारा (5,960), सार्वजनिक तक्रारींवरील अपिलांचा निपटारा (1,013), आयएमसी संदर्भांचा निपटारा (3) आणि अभिलेख व्यवस्थापनांतर्गत जुन्या 14,625 कागदी तसेच इलेक्ट्रॉनिक फाइल्सचा आढावा घेणे यांचा समावेश आहे. याशिवाय, खासदारांकडून प्राप्त झालेल्या 304 प्रलंबित संदर्भांचा आणि राज्य सरकारांकडून प्राप्त झालेल्या 77 संदर्भांचा निपटारा करण्यात आला. तसेच, मोहिमेदरम्यान संसदेतील 4 आश्वासने आणि पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या 17 संदर्भांचाही निपटारा करण्यात आला.

मोहिमेअंतर्गत विविध निकषांनुसार निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य होत आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिवांनी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेतला.

विशेष मोहीम 6 च्या यशस्वी अंमलबजावणीतून स्वच्छतेला प्रोत्साहन देणे, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणे, उत्तरदायित्व अधिक बळकट करणे आणि उत्पादक कार्यवातावरण निर्माण करणे यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची सातत्यपूर्ण बांधिलकी दिसून येते.


Trending

Exit mobile version