गोवा खबर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ. इंद्रदेव शुक्ला (आयपीएस, निवृत्त) यांनी भारतातील नवीन फौजदारी कायद्यांवर लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या (SPCA) अध्यक्षा निवृत्त न्यायमूर्ती नूतन सरदेसाई आणि प्राधिकरणाचे सदस्य ॲड. रघुवीर व्ही. एस. वर्दे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, नवीन फौजदारी कायद्यांविषयी नागरिकांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागरिकांना त्यांच्या अधिकारांची आणि जबाबदाऱ्यांची माहिती मिळाल्यास न्यायव्यवस्था अधिक सुलभ आणि नागरिककेंद्रित होण्यास मदत होईल.
कायदेशीर साक्षरता आणि जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी डॉ. इंद्रदेव शुक्ला यांचे अभिनंदन केले.