गोवा खबर

म्हापसा प्रकरणातील चार वर्षीय मुलीची प्रकृती स्थिर; पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांची माहिती

Published

on

Spread the love

गोवा खबर: म्हापसा येथील गंभीर गुन्ह्याप्रकरणातील चार वर्षीय मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

या प्रकरणाचा शास्त्रीय पद्धतीने सखोल तपास करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येईल. तसेच प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी, यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी दुकानदार तसेच रहिवाशांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहनही पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी केले.

Trending

Exit mobile version