गोवा खबर : अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पुंडलिक गुडगे (२८) याला म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मूळचा कर्नाटकातील धारवाड येथील रहिवासी असलेल्या गुडगे याला पोलिसांनी पणजी येथून ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा पुढील तपास म्हापसा पोलीस करत आहेत.