गोवा खबर:वास्को संडे मार्केटमधील आग दुर्घटनेनंतर महत्त्वाची प्रशासकीय घडामोड घडली असून, मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना कार्मिक विभागात (Personnel Department) हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांच्याकडे मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, सिद्धिविनायक नाईक यांनी अलीकडेच वास्कोतील अनेक जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या.