गोवा खबर

टपाल विभाग प्रादेशिक स्तरावर ‘पेन्शन आणि डाक अदालत’ आयोजित करणार

Published

on

Spread the love


4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार

गोवा खबर:टपाल विभागाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी येथे विभागीय स्तरावरील पेन्शन आणि डाक अदालतीचे आयोजन केले आहे. पेन्शन अदालत दुपारी 3.00 वाजता तर डाक अदालत सकाळी 11.00 वाजता आयोजित केली जाईल.

टपाल विभागातील  जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत किंवा सेवेत असताना मरण पावले आहेत, आणि त्यांच्या पेन्शन आणि पेन्शनविषयक लाभांशी संबंधित तक्रारी, प्रारंभिक अर्ज भरल्यावर निकाली काढल्या गेल्या नाहीत, त्या ‘पेन्शन अदालत’मध्ये विचारात घेतल्या जातील. वारसाहक्काबाबतचे वाद आणि विमा विषयक बाबींशी संबंधित तक्रारी पेन्शन अदालत मध्ये विचारात घेतल्या जाणार नाहीत.

निवृत्तीवेतनधारक त्यांचे अर्ज महेश एन., वरिष्ठ लेखाधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा विभाग, पणजी-403001 येथे, किंवा accts.goa@indiapost.gov.in या ईमेल वर 4 नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात.

गोवा क्षेत्राशी संबंधित टपाल सेवांविषयीच्या तक्रारींवर ‘डाक अदालत’मध्ये विचार केला जाईल. यामध्ये पत्रव्यवहार, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक आणि मनी ऑर्डरची रक्कम न मिळणे यांसारख्या तक्रारींचा समावेश असेल, ज्या अर्ज सादर केल्यापासून सहा आठवड्यांच्या आत निकाली काढल्या गेलेल्या नाहीत.

इच्छुक ग्राहक त्यांच्या तक्रारी सहाय्यक संचालक पोस्टल सर्व्हिसेस-I, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा विभाग, पणजी-403001 येथे डुप्लिकेट स्वरुपात पाठवू शकतात. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे.

Trending

Exit mobile version