गोवा खबर

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते बंगळुरु- मुंबई वंदे भारत शयनयान जलद एक्स्प्रेस रेल्वेला हिरवा झेंडा

Published

on

Spread the love


उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, एच. डी. कुमारस्वामी, रेल्वे राज्य मंत्री व्ही सोमण्णा आणि इतर मान्यवरांची हजेरी.

नवीन वंदे भारत शयन जलद एक्सप्रेस रेल्वेमुळे बंगळुरु आणि मुंबई दरम्यानचा संपर्क वाढणार, भारताची माहिती-तंत्रज्ञान आणि स्टार्टअप राजधानी आर्थिक राजधानीशी जोडली जाणारः अश्विनी वैष्णव.

आधुनिक रात्रकालीन रेल्वे सेवेचा व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांना होणार फायदा.

गोवा खबर:केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज एसएमव्हीटी बंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम), मुंबई वंदे भारत शयनयान जलद रेल्वेगाडीला, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, रेल्वेराज्य मंत्री व्ही सोमण्णा, राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यामुळे दोन प्रमुख महानगरीय आणि आर्थिक केंद्रांमधील आधुनिक रात्रकालीन रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक बळकट होण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

https://platform.twitter.com/embed/Tweet.html?dnt=false&embedId=twitter-widget-0&features=eyJ0ZndfdGltZWxpbmVfbGlzdCI6eyJidWNrZXQiOltdLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X2ZvbGxvd2VyX2NvdW50X3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9iYWNrZW5kIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19yZWZzcmNfc2Vzc2lvbiI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZm9zbnJfc29mdF9pbnRlcnZlbnRpb25zX2VuYWJsZWQiOnsiYnVja2V0Ijoib24iLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X21peGVkX21lZGlhXzE1ODk3Ijp7ImJ1Y2tldCI6InRyZWF0bWVudCIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfZXhwZXJpbWVudHNfY29va2llX2V4cGlyYXRpb24iOnsiYnVja2V0IjoxMjA5NjAwLCJ2ZXJzaW9uIjpudWxsfSwidGZ3X3Nob3dfYmlyZHdhdGNoX3Bpdm90c19lbmFibGVkIjp7ImJ1Y2tldCI6Im9uIiwidmVyc2lvbiI6bnVsbH0sInRmd19kdXBsaWNhdGVfc2NyaWJlc190b19zZXR0aW5ncyI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdXNlX3Byb2ZpbGVfaW1hZ2Vfc2hhcGVfZW5hYmxlZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdmlkZW9faGxzX2R5bmFtaWNfbWFuaWZlc3RzXzE1MDgyIjp7ImJ1Y2tldCI6InRydWVfYml0cmF0ZSIsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfbGVnYWN5X3RpbWVsaW5lX3N1bnNldCI6eyJidWNrZXQiOnRydWUsInZlcnNpb24iOm51bGx9LCJ0ZndfdHdlZXRfZWRpdF9mcm9udGVuZCI6eyJidWNrZXQiOiJvbiIsInZlcnNpb24iOm51bGx9fQ%3D%3D&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=2116813467185504637&lang=en&origin=https%3A%2F%2Fwww.pib.gov.in%2FPressReleasePage.aspx%3FPRID%3D2331364%26reg%3D1%26lang%3D9&sessionId=b374a8be671994b714bc005d856ff5f492676211&theme=light&widgetsVersion=6a3ad42b224df%3A1778106238597&width=550px

अत्याधुनिक शयनयान असलेल्या आधुनिक रेल्वेमुळे, बंगळुरु आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी एक आधुनिक, आरामदायक आणि कार्यक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. या सेवेचा फायदा व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना होणार आहे, त्याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील महत्त्वाच्या प्रादेशिक केंद्रांना जोडणारी संपर्क व्यवस्था अधिक बळकट होणार आहे.

जानेवारी 2026 मध्ये हावडा- गुवाहाटी वंदे भारत सेवेची सुरुवात केल्यानंतर आणि काल वाराणसी- दिल्ली वंदे भारत शयनयान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता, बंगळुरु -मुंबई सेवेच्या रूपाने आधुनिक रात्रकालीन रेल्वे प्रवास जाळे अधिक विस्तारले आहे. त्यामुळे प्रवासी केंद्रित सेवा देण्याची भारतीय रेल्वेची वचनबद्धता अधोरेखित होते.

बंगळुरु-मुंबई वंदे भारत शयनयान जलद रेल्वेच्या आरंभावर प्रकाश टाकताना वैष्णव म्हणाले की, या सेवेमुळे देशाची माहिती-तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सची राजधानी असलेले बंगळुरु देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी जोडले जाणार आहे. ही रेल्वे आंध्र प्रदेशातील गुंतकल, कर्नाटकातील रायचूर, यादगीर आणि कलबुर्गी आणि महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे आणि कल्याण मार्गे धावणार असून, यामुळे उत्तर कर्नाटकमधील अशा अनेक भागांना रात्रकालीन रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे, ज्या भागांमध्ये जागतिक दर्जाच्या रेल्वे सेवा उपलब्ध नव्हत्या. त्यांनी अशीही घोषणा केली की, कर्नाटकसाठी पुढील वंदे भारत शयनयान रेल्वे सेवा बंगळुरु वरून सुरू होईल जी राज्यातल्या उत्तर भागातल्या हुबळीला जोडून पुणे आणि मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होईल.

केंद्रीय मंत्र्यांनी पुढे अशी घोषणा केली की, बंगळुरू आणि मंगळुरू दरम्यान वंदे भारत रेल्वे सेवा येत्या काही आठवड्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून यशस्वी चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. या सेवेमुळे बंगळुरू आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील भागांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. या नवीन सेवेमुळे या प्रदेशाला अधिक वेगवान, आरामदायी आणि जागतिक दर्जाची रेल्वे वाहतूक सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, प्रवाशांना अधिक चांगली संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि कर्नाटकच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित सुधारणा आणि जलद रेल्वे सेवांचा विस्तार महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कर्नाटकमधील जलद रेल्वे संपर्क सुविधांच्या विस्तारावर तसेच प्रादेशिक संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि आर्थिक एकात्मतेला चालना देण्यासाठी नव्या रेल्वे मार्गिकांच्या विकासावर भर दिला. प्रवासाच्या वेळेत होणारी अपेक्षित घट अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, बंगळुरू ते चेन्नई हा प्रवास केवळ 73 मिनिटांत, तर बंगळुरू ते हैदराबाद हा प्रवास सुमारे 2 तास आणि 10 मिनिटांत पूर्ण होईल.

ही रेल्वे बंगळुरूच्या एसएमव्हीटी स्थानकावरून 19:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे सीएसएमटी येथून 20:10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:00 वाजता बंगळुरूच्या एसएमव्हीटी स्थानकावर पोहोचेल. ही रेल्वे सेवा आठवड्यातून 6 दिवस चालवण्यात येईल. बंगळुरूहून सुटणाऱ्या दिशेने सोमवारी, तर मुंबईहून सुटणाऱ्या दिशेने मंगळवारी ही सेवा उपलब्ध नसेल.

Trending

Exit mobile version