मिशन ३०+ मध्ये कुठ्ठाळी मतदारसंघाची महत्त्वाची भूमिका
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत कुठ्ठाळीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचा भाजपचा निर्धार
गोवा खबर: आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मिशन ३०+ मध्ये कुठ्ठाळी मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. कुठ्ठाळी येथील भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला मंत्री, आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कुठ्ठाळी मतदारसंघातील शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठ्ठाळी मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भाजपने भर दिला आहे. नवीन कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाचे संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मजबूत नेतृत्व, कार्यकर्त्यांची एकजूट आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत कुठ्ठाळी मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
कुठ्ठाळीत यावेळी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धारही पक्षाने व्यक्त केला आहे.
गोव्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ३० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असून, या मिशनमध्ये कुठ्ठाळी मतदारसंघाचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.