गोवा खबर:बांबोळी मिलिटरी कॅम्प ग्राउंड आणि होली क्रॉस श्राइन, बांबोळी दरम्यानच्या राष्य्रीय महामार्ग-६६ भाग, पवित्र तीर्थक्षेत्राजवळ पादचारी पुल सुरक्षितपणे उभारण्यासाठी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रस्ता बंद राहील.
पणजी ते आगशीसाठी हलक्या मोटार वाहनांकरिता पर्यायी मार्ग मेरशी सर्कल ते पिलार जंक्शन (ओल्ड गोवा रोडमार्गे) आणि मेरसी सर्कल ते गोवा वेल्हा (मिलिटरी कॅम्प, मेरशीमार्गे) असेल आणि अवजड व्यावसायिक वाहनांसाठी पर्यायी मार्ग मेरशी सर्कल ते मडगाव (ओल्ड गोवा-फोंडामार्गे) असेल.
हलक्या मोटार वाहनांसाठी आगशी ते पणजीकडे जाणारा पर्यायी मार्ग गोवा वेल्हा जंक्शन ते बांबोळी (सिरदाव रोड – ग्रँड हयात मार्गे) आणि आगशी जंक्शन ते पणजी (पिलार, ओल्ड गोवा मार्गे) असेल आणि अवजड व्यावसायिक वाहनांसाठी पर्यायी मार्ग मडगाव (फोंडा मार्गे) आणि वेर्णा जंक्शन (लोटली – लोटलीमार्गे फोंडा) येथून असेल.
आपत्कालीन वाहनांवर (अॅम्ब्युलन्स, अग्निशमन सेवा इत्यादी) मार्गातील बदलाचा परिणाम होणार नाही आणि त्यांना राष्य्रीय महामार्ग-६६ च्या मूळ मार्गावरून आणि सर्व्हिस रोडवरून जाण्याची परवानगी दिली जाईल.