गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील सर्व लोकांना दुर्गापूजेच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “दुर्गा पूजा हा वाईटावर सद्गुणाचा, अन्यायावर न्यायाचा आणि असत्यावर सत्याचा विजय साजरा करण्याचा सण आहे. शक्ती, धैर्य, करुणा आणि दैवी कृपेचे प्रतीक असलेल्या दुर्गा मातेची उपासना, आपल्याला दृढ निश्चयाने आव्हानांना सामोरे जाण्याची आणि श्रद्धा व चिकाटीने संकटांवर मात करण्याची आपल्या प्रत्येकातील शक्तीची आठवण करून देते.”

या पवित्र प्रसंगी, आपण शांतता, एकता, सहिष्णुता आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांप्रति आपली वचनबद्धता पुन्हा एकदा दृढ करूया. माता दुर्गेचा दिव्य आशीर्वाद आपल्याला समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कार्य करण्याचे सामर्थ्य आणि गरजूंप्रति दया व करुणा दाखविण्याची प्रेरणा देवो.”

 “मा दुर्गा आम्हा सर्वांना  प्रत्येक आव्हानावर मात करण्याचे सामर्थ्य आणि बुद्धी देवो आणि एका उज्ज्वल, शांततापूर्ण व समृद्ध भविष्याकडे मार्गदर्शन करो. तिच्या दिव्य आशीर्वादाने प्रत्येकाला सुख, उत्तम आरोग्य, शांतता आणि समृद्धी लाभो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version