गोवा खबर

ऑक्टोबरनंतर वीज बिलांची प्रक्रिया सुरळीत होणार; उद्योगांचे दरही कमी होणार : वीज मंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर:ऑक्टोबर महिन्यापासून राज्यातील वीज बिलांची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत होईल, अशी माहिती गोव्याचे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली आहे.

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगांसाठी अतिरिक्त वीज सुमारे १२.५० रुपयांना खरेदी करावी लागली होती. त्यामुळे उद्योगांसाठी हा दर ३१ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आला असून, त्यानंतर तो प्रति युनिट ८ रुपये २० पैशांपर्यंत खाली येईल. बाजारभावातील चढ-उतारानुसार दरांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील आणि हा निर्णय उद्योग जगताशी चर्चा करूनच घेण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विजेच्या बिलांविषयी येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण आता मोठ्या प्रमाणावर कमी झाले असून, उर्वरित तक्रारींवर विचारविनिमय सुरू आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. याशिवाय, जादा बिलांपोटी सुमारे ४२ कोटी रुपयांचा परतावा (रिफंड) ग्राहकांना देण्यात आला असल्याची माहितीही वीज मंत्र्यांनी दिली.

Trending

Exit mobile version