गोवा खबर

‘डेव्हलपमेंट डायलॉग्स’ पुस्तकाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन

Published

on

Spread the love

गोवा खबर: आधुनिक भारताचा विकासप्रवास, विकासाच्या विविध संकल्पना आणि देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या विचारांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘डेव्हलपमेंट डायलॉग्स : जर्नीज, आयडियाज अँड द मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ (Development Dialogues: Journeys, Ideas and the Makers of Modern India) या पुस्तकाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पणजीतील आल्तिनो येथील सुनापरांत – गोवा सेंटर फॉर द आर्ट्स येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी व्ही. एम. साळगावकर समूहाचे अध्यक्ष दत्तराज व्ही. साळगावकर, इंटरनॅशनल सेंटर गोवाचे (आयसीजी) संचालक डॉ. पुष्कर, यतीन काकोडकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या पुस्तकाच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या विकासप्रवासातील विविध कल्पना, विचार आणि दृष्टिकोन मांडण्यात आले आहेत. विकासासंदर्भातील विविध विषयांचा अभ्यास करून त्यांना पुस्तकाचे स्वरूप दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दत्तराज साळगावकर यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, अशा प्रकारची पुस्तके समाजात विविध विषयांवर वैचारिक चर्चा घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाच्या विकासाला दिशा देणाऱ्या कल्पना, व्यक्तींचे योगदान आणि त्यांच्या कार्याचा प्रवास समजून घेण्यासाठी अशा पुस्तकांचा उपयोग होतो.

भारताच्या विकासप्रवासाविषयी अधिक सखोल समज निर्माण करण्याबरोबरच विचारांची देवाणघेवाण आणि विधायक संवादाला चालना देण्यासाठी अशा साहित्याचे महत्त्व मोठे आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

#Goa#GoaNews#PramodSawant#DevelopmentDialogues#DattarajSalgaocar#Sunaparanta#GoaKhabar

Trending

Exit mobile version