गोवा खबर

वाळपईत नव्या विभागीय कृषी कार्यालयाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन; शेतकऱ्यांना कृषी कार्डांचे वितरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील वाळपई येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विभागीय कृषी कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. देविया राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कृषी कार्डांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भात खरेदीच्या दरात वाढ, कृषी अनुदान, मृदा आरोग्य कार्ड आणि सामूहिक शेती यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक मदत देण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना शेतीसंबंधी विविध सरकारी योजना आणि कृषी विभागाच्या सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नवीन कार्यालय महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाळपईतील नव्या विभागीय कृषी कार्यालयामुळे सत्तरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. तसेच शेतीविषयक योजना आणि सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

Trending

Exit mobile version