गोवा खबर

पेडणेतील ट्रक चालकांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार : आमदार प्रवीण आर्लेकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणे तालुक्यातील ट्रक चालकांच्या समस्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिले. तसेच रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बार्देश-पेडणे ट्रक असोसिएशनच्या बैठकीत आमदार आर्लेकर यांनी ट्रक चालकांशी संवाद साधला. यावेळी ट्रक चालकांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

ट्रक चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच स्थानिक ट्रक व्यावसायिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले जातील, असे आर्लेकर यांनी सांगितले.

या बैठकीला बार्देश-पेडणे ट्रक असोसिएशनचे प्रतिनिधी मिलिंद शेट्ये, संघटनेचे इतर पदाधिकारी आणि ट्रक चालक उपस्थित होते.

Trending

Exit mobile version