गोवा खबर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गोवा प्रभारी डॉ. भारती पवार आणि गोवा सहप्रभारी अनिल अँटनी यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील महालक्ष्मी येथे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
गोव्यातील जनतेची सेवा करण्यासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे मार्गदर्शन आगामी काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.