गोवा खबर

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; दोनापावला येथील निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका

Published

on

Spread the love

गोवा खबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गोव्यातील दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने पणजीतील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचविता आले नाहीत.

नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी तब्बल ४५ मिनिटे सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) दिला. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मणिपाल रुग्णालयाचे डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण (MLC) म्हणून नोंद करण्यात आली असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयशैलीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली. विविधांगी भूमिका, प्रभावी संवादफेक आणि वास्तववादी अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले.

Trending

Exit mobile version