गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कदंब पठारावरील भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) शिवप्रकाश आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गोवा प्रभारी डॉ. भारती पवार यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिवप्रकाश आणि डॉ. भारती पवार यांच्यासोबत विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. राज्यातील पक्ष संघटनेचे कामकाज, जनतेशी संपर्क वाढविणे तसेच विविध स्तरांवरील संघटनात्मक उपक्रमांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीत ‘सेवा संकल्प अभियान’च्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. अभियानाच्या माध्यमातून संघटनात्मक संपर्क अधिक मजबूत करणे आणि गोव्यातील जनतेशी प्रभावी संवाद व संपर्क सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.
गोव्यात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध कार्यक्रम सुरू असून, राज्य सरकारच्या माहितीनुसार या उपक्रमांत नागरिकांपर्यंत सरकारी योजना आणि सेवा पोहोचविण्यावरही भर देण्यात आला आहे.