अंमली पदार्थमुक्त आणि सुदृढ भारताचा संदेश पसरवण्याचे तरुणांना आवाहन
गोवा खबर:विकसित भारतासाठी नशामुक्त युवा – 100 रविवार या मोहिमेअंतर्गत, माय भारत गोवा आणि गोवा ऑलिम्पिक संघटना यांच्यातर्फे 4 ऑक्टोबर 2026 रोजी पणजीत मिरामार येथे नशामुक्त युवा मॅरेथॉन होणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे, तसेच शारीरिक तंदुरुस्ती, निरोगी जीवनशैली आणि जनसहभागाला चालना देणे हा आहे.
हे मॅरेथॉन सकाळी 7:00 वाजता मिरामार सर्कल येथून सुरू होईल आणि सहभागी होणाऱ्यांनी सकाळी 6:30 वाजेपर्यंत तिथे पोहोचायचे आहे कारंझालेम पार्कच्या दिशेने जाऊन पुन्हा मिरामार सर्कल इतक्या अंतराचे हे मॅरेथॉन आहे. मॅरेथॉन नंतर पदक वितरण समारंभ होईल.
राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील. यात गोव्याभरातून सुमारे 400 युवक सहभागी होणार आहेत. विद्यार्थी, युथ क्लबचे सदस्य आणि विविध युवा संघटनांचे प्रतिनिधी या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची शक्यता आहे.
नागरिक, युवा संघटना आणि शैक्षणिक संस्थांना या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आणि अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश पसरवण्यास मदत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.