गोवा खबर:राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील आणि देशभरातील लोकांना गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “महात्मा गांधींचे जीवन हे सत्य, अहिंसा, साधेपणा आणि मानवसेवेचे एक आदर्श उदाहरण आहे. त्यांची भारतासंबंधीची संकल्पना केवळ राजकीय स्वातंत्र्यातच नव्हे, तर सामाजिक सलोखा, श्रम प्रतिष्ठा, आत्मनिर्भरता आणि समाजाप्रती प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीतही रुजलेली आहे.
“गांधीजी स्वच्छतेला निरोगी आणि प्रतिष्ठित जीवनाचा एक अविभाज्य भाग मानत असत. त्यामुळे स्वच्छ भारत दिनाचे महत्त्व केवळ आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेपुरतेच मर्यादित नाही तर खऱ्या अर्थाने स्वच्छ भारतासाठी आपल्या सवयी, दृष्टिकोन आणि वर्तनात सातत्यपूर्ण बदलाची आवश्यकता आहे.
“गांधी जयंती साजरी करीत असताना, आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, सार्वजनिक जागांचा आदर करणे आणि आपल्या समाजासाठी जबाबदारीने योगदान देणे या आपल्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करूया. स्वच्छता ही केवळ अधूनमधून राबवली जाणारी मोहीम न राहता, ती एक दैनंदिन शिस्त आणि सामूहिक जबाबदारी बनली पाहिजे.
“गांधीजींच्या कालातीत आदर्श तत्वे आचरणात आणण्यासाठी आणि एका स्वच्छ, निरोगी, अधिक दयाळू व अधिक जबाबदार भारताच्या दिशेने एकत्रितपणे कार्य करण्यासाठी हा दिवस आपल्याला प्रेरणा देवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.