गोवा खबर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्रिस्तांव द ब्रागांझा कुन्हा यांना आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील आझाद मैदानावर ‘गोमंतकीय राष्ट्रवादाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे त्रिस्तांव द ब्रागांझा कुन्हा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील कुन्हा यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मुख्यमंत्र्यांनी स्मरण केले. गोमंतकीय अस्मिता, स्वाभिमान आणि मुक्तीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.

कुन्हा यांचा साहस, देशभक्ती आणि गोव्यावरील प्रेमाचा वारसा आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version