गोवा खबर

Published

on

Spread the love

महाराष्ट्र आणि गोवा संचार लेखा नियंत्रक कार्यालयात आयोजित हिंदी पखवाडा 2026 चा समारोप

25 SEP 2026  Mumbai



निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल
बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल

गोवा खबर:महाराष्ट्र आणि गोवा संचार  लेखा नियंत्रक कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदी पखवाडा  2026 या उपक्रमाचा आज यशस्वी समारोप झाला. शासकीय कामकाजात हिंदी भाषेचा वापर वाढवणे आणि अधिक विकसित करणे या संकल्पनेवर समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सरकारी संवादात हिंदीच्या वापराला प्रोत्साहन देता यावे या उद्देशाने, या हिंदी पखवाड्यादरम्यान विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या काळात हिंदी भाषेशी संबंधित अनेक स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

समारोपाच्या कार्यक्रमात हिंदी भाषेशी संबंधित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि सहभागाबद्दल सन्मानही केला गेला. या कार्यक्रमात शासकीय कामकाज आणि सार्वजनिक प्रशासनातील हिंदी भाषेचे महत्त्व, हिंदीचा प्रचार प्रसार आणि भूमिका अशा मुद्यांवर चर्चात्मक संवादही झाला.

या हिंदी पंधरवड्याच्या यशस्वी आयोजनात महाराष्ट्र आणि गोवा संचार  लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शासकीय कामकाजात हिंदीच्या वापराला चालना देण्याचे महत्त्व त्यांनी समारोपाच्या कार्यक्रमातून अधोरेखीत केले. यासोबतच या भाषेचा वापर अधिक वाढावा यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

हिंदी पखवाडा  2026 या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनातून, हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्याची तसेच राजभाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होईल याची सुनिश्चिती  करण्याची महाराष्ट्र आणि गोवा संचार लेखा नियंत्रक कार्यालयाची वचनबद्धताही पुन्हा एकदा दिसून आली.

Trending

Exit mobile version