गोवा खबर

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भारतीय नौदलाच्या पहिल्याच अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज जहाजबांधणीच्या कामाला सुरुवात

Published

on

Spread the love

गोवा खबर:कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीमध्ये (सीएसएल) भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज जहाज (एनजीएमव्ही) प्रकल्पातील पहिल्याच जहाजबांधणी कामाची सुरुवात 18 सप्टेंबर 2026 रोजी कील लेइंग समारंभाने झाली. युद्धनौका उत्पादन व अधिग्रहण नियंत्रक, व्हाइस ऍडमिरल संजय साधू या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतीय नौदल व सीएसएल कंपनीचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मार्च 2023 मध्ये सीएसएल कंपनीसोबत एनजीएमव्ही जहाजबांधणी करार करण्यात आला होता. एनजीएमव्हीमध्ये आधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यासाठी तयार व युद्धसज्ज दल म्हणून भारतीय नौदलाचे युद्धसामर्थ्य लक्षणीयरित्या वाढेल.

हिंद महासागर क्षेत्रातील कठीण सागरी क्षेत्रात काम करण्यास सक्षम असलेले एक भक्कम व आधुनिक आरमार उभारण्याची भारताची वचनबद्धता एनजीएमव्हीच्या बांधकामातून अधोरेखित होते.

या प्रकल्पामध्ये सर्व प्रमुख निर्णायक साधने देशातच विकसित व उत्पादित झाल्यामुळे भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगाची वाढती स्वदेशी बनावटीची क्षमतादेखील अधोरेखित झाली आहे. या प्रकल्पाचे कामकाज केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनांशी सुसंगत आहे. 

Trending

Exit mobile version