गोवा खबर

भारत – श्रीलंका वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव स्लिनेक्स – 26

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय सागरी सराव, स्लिनेक्स- 26, ची 13 वी आवृत्ती 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित केली जात आहे. या सरावाची सुरुवात हार्बर फेज ने झाली असून, त्यानंतर सी फेज  होईल.

भारतीय नौदलाकडून आयएनएस कावरत्ती, एक स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्ध कॉर्व्हेट, आणि आयएनएस ज्योती, एक फ्लीट टँकर, सहभागी होतील, तर श्रीलंकेच्या नौदलाचे प्रतिनिधित्व एसएलएनएस सिंदुराला करेल.

2005 मध्ये संकल्पित झालेला स्लिनेक्स, दोन्ही नौदलांमध्ये सागरी सहकार्य, आंतरकार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे. पूर्व नौदल कमांडच्या अखत्यारीत आयोजित करण्यात आलेल्या हार्बर फेजची सुरुवात, एसएलएनएस सिंदुरालाच्या पाहुण्या कर्मचाऱ्यांसाठी आयएनएस कावरत्तीवर एका उद्घाटन समारंभाने आणि स्वागत समारंभाने झाली. या टप्प्यामध्ये व्यावसायिक संवाद, क्रॉस-डेक भेटी, सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण, योग, खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे. त्यानंतरच्या सी फेजमध्ये समुद्रातील समन्वित उपक्रमांद्वारे कार्यान्वयन समन्वय आणि आंतरकार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

भारताच्या महासागर संकल्पनेशी सुसंगत असलेला स्लिनेक्स-26, सुरक्षित, स्थिर आणि सर्वसमावेशक सागरी वातावरणाप्रती भारताची वचनबद्धता दृढ करतो आणि भारत व श्रीलंका यांच्यातील चिरस्थायी सागरी भागीदारीला अधिक मजबूत करतो.

Trending

Exit mobile version