गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love




गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षक दिनानिमित्त गोव्यातील सर्व शिक्षक समाजाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

 आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात,  ५ सप्टेंबर हा दिवस आपल्या मुलांचे जीवन आणि समाजाचे भविष्य घडविण्यात शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यास आणि त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. तत्वज्ञानी, शिक्षणतज्ज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, ज्यांचे जीवन शिक्षक वर्गासाठी एक प्रेरणास्थान आहे.

शिक्षक विध्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवितात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मूल्ये व चांगले संस्कार करतात. शिक्षक विध्यार्थ्यांना विचार करण्यास आणि जीवनातील येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करतात.

 “आज शिक्षणाच्या  क्षेत्रात एक उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध केल्या आहेत. त्यासाठी शिक्षकांनी विध्यार्थ्यांना करियर पुरतेच नव्हे तर सर्जनशीलता, चिकित्सक विचार, करुणा, अनुकूलनक्षमता आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.  

“गोवा  सरकार आपली शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी बांधील आहे. आपल्या शिक्षकांच्या समर्पणाने आणि पालक, शाळा व व्यापक समाजाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आपण ज्ञानी, कुशल, दयाळू आणि संस्कारीत पिढी निर्माण करू शकतील.

आजच्या शिक्षक दिनानिमित्त गोव्यातील शिक्षक वर्गाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्काराच्या मानकरींचेही अभिनंदन करतो,  आपले शिक्षक तरुण मनांना प्रकाशित करत राहोत, त्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देत राहोत आणि प्रत्येक मुलाला त्याची पूर्ण क्षमता साकार करण्यासाठी सक्षम करोत  असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version