गोवा खबर

म्हजी लॅब, बरी लॅब – प्रयोगशाळा पुरस्कार जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर:शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ‘म्हजी लॅब, बरी लॅब — गोवा राज्य सर्वोत्कृष्ट आयसीटी प्रयोगशाळा पुरस्कार योजने’च्या विजेत्यांची घोषणा केली आहे.

उत्तर गोव्यातील फादर आग्नेल हायस्कूल, पिलार (श्रेणी अ) आणि जी.एस. आमोणकर विद्या मंदिर, म्हापसा (श्रेणी ब) या विजेत्या संस्था आहेत. दक्षिण गोव्यातील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे उच्च माध्यमिक विद्यालय, बाराझन, उसगाव, फोंडा (श्रेणी अ) आणि होली रोझरी कॉन्व्हेंट हायस्कूल, नुवे, सासष्टी (श्रेणी ब) हे विजेते आहेत. कुशावती जिल्ह्यात गव्हर्नमेंट हायस्कूल, आंबावली, केपे (श्रेणी अ) आणि पी.एम. श्री गव्हर्नमेंट हायस्कूल, गवाळ खोल, काणकोण (श्रेणी ब) हे विजेते आहेत.

या योजनेअंतर्गत, ‘अ’ श्रेणीतून प्रत्येक जिल्ह्यातील एका विजेत्या आयसीटी प्रयोगशाळेला प्रत्येकी रु. २,००,०००/- चे तीन पुरस्कार, तर ‘ब’ श्रेणीतून प्रत्येक जिल्ह्यातील एका विजेत्या आयसीटी प्रयोगशाळेला प्रत्येकी रु. ३,००,०००/- चे तीन पुरस्कार दिले जातात.

शिक्षण संचालनालयाने सर्व विजेत्या शाळांचे अभिनंदन केले असून, आयसीटी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि शालेय वातावरणात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शाळा प्रशासन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे .

Trending

Exit mobile version