गोवा खबर:१०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आंतरजोडणीचे तांतडीने दुरूस्ती काम करण्याचे असल्याने ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० ते ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत २४ तास नेत्रावळी, झांबावली, रिवण), सांवर्डे (गुड्डेमोळ), शिरोडा, केपे, बाळ्ळी पंपिंग स्टेशन, गुडी, मडगाव शहर, फातोर्डा, राया, फतेहपूर, हांडका, लोटली, कांसावली, नागोवा, कुंकळी, कुडतरी, नुवें, कुठ्ठाळी, दाबोली, वास्को आणि मुरगांव मतदारसंघातील जल पुरवठ्यावर कांही प्रमाणात परिणाम होईल. परंतु कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगांव भागांतील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास आणखी दोन दिवस लागतील.
१६० एमएलडी क्षमतेचा साळावली जल प्रक्रिया प्रकल्प शटडाउनच्या कालावधीत पूर्णपणे कार्यरत राहील. ग्राहकांनी या गैरसोयीची नोंद घ्यावी असे पेयजल विभागाने कळविले आहे.