११ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला; ७ आणि ८ सप्टेंबरला नागरिकांना उड्डाणपुलावर फिरण्याची संधी
गोवा खबर : बहुप्रतीक्षित पर्वरी उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी याबाबत माहिती दिली.
उद्घाटनानंतर ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून उड्डाणपूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
दरम्यान, उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी ७ आणि ८ सप्टेंबर रोजी नागरिकांना उड्डाणपुलावर चालण्याची तसेच फोटो काढण्याची संधी दिली जाणार आहे. या दोन्ही दिवशी उड्डाणपुलावर कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा पर्वरी येथील हॉटेल मॅजेस्टिकजवळ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.