गोवा खबर: पर्वरी येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. गोव्यासारख्या राज्यात अशा प्रकारची घटना अजिबात सहन केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
या गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून तुरुंगात टाकले जाईल. तसेच हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचाही लवकरच उलगडा होईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
गोवा सरकार अशा प्रकारच्या घटना कदापि सहन करणार नाही. या प्रकरणातील सर्व संबंधितांना तातडीने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना (DGP) देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
“पर्वरीतील गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना लवकरच अटक करून तुरुंगात टाकले जाईल. हल्ल्यामागील कारणही लवकरच समोर येईल. गोव्यात अशा घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत,” असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.