गोवा खबर : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने गोव्यातील मोरजी समुद्रकिनाऱ्याला भेट दिली असून, या भेटीतील सुंदर क्षणांचे फोटो तिने फेसबुकवर शेअर केले आहेत.
मोरजी किनाऱ्यावरील सूर्यास्त, समुद्राच्या लाटा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतानाचे फोटो उर्मिलाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले. या फोटोंमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना तसेच समुद्राच्या पार्श्वभूमीवर निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे.
“In Goa state of being…” असे कॅप्शन देत उर्मिला मातोंडकरने हे फोटो शेअर केले आहेत.
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरणाचा आनंद घेत उर्मिलाने आपल्या गोवा भेटीतील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत