गोवा खबर

माहिती खात्यात वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर:माहिती आणि प्रसिद्धी खात्याची वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा धार्मिक उत्साहात संपन्न झाली.

सदर खात्यातर्फे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. यावर्षी कोकणी अनुवादक श्री विष्णू गांवकर आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सरिता विष्णू गांवकर यांच्याहस्ते धार्मिक विधी पार पाडले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खात्याला भेट देऊन श्री सत्यनारायण देवाचे आशिर्वाद घेतले. यावेळी मुख्य माहिती आयुक्त श्री. आराविंदकुमार एच. नायर, सरकारी अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. माहिती व प्रसिद्धी संचालक श्री. अभिर हेदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

सकाळी पारंपरिक विधींने कार्यक्रमास सुरुवात झाली, त्यानंतर आरती आणि भक्तीपूर्ण भजने सादर करण्यात आली. श्री प्रमोद नाईक, श्री सर्वेश फडके यांच्या नेतृत्वाखालील विर्डी भजनी मंडळाने खात्यांतील कर्मचाऱ्यांसोबत भजन सादर करून भक्तीपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण केले. तसेच सदर खात्यांतील कर्मचाऱ्यांनी पारंपरिक फुगडी सादर केली.

Trending

Exit mobile version