गोवा खबर

मराठी राजभाषेसाठी कायदादुरुस्तीचा ठराव घ्या; फळदेसाई, तवडकरांना निवेदन

Published

on

Spread the love

गोवा खबर: मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे सुरू असलेल्या आमदार भेटींच्या सत्रांतर्गत सांगेचे आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकर यांची त्यांच्या मतदारसंघांतील मराठीप्रेमींनी बुधवारी भेट घेतली. आगामी विधानसभा अधिवेशनात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी आवश्यक कायदादुरुस्तीचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी करणारी निवेदने दोन्ही मंत्र्यांना सादर करण्यात आली.

मराठी राजभाषा निर्धार समितीने राज्यातील आमदारांची भेट घेऊन मराठी राजभाषेच्या मागणीसाठी त्यांचा पाठिंबा मिळविण्याचे सत्र सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून सांगे मतदारसंघातील मराठीप्रेमींनी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची भेट घेतली आणि मराठी राजभाषेसंदर्भातील मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.

फळदेसाई यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात गजानन हरमलकर, रामकृष्ण वेर्लेकर, विनय नाईक, सुभाष नाईक आदी प्रमुख मंडळींचा समावेश होता.

तसेच काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकर यांचीही मराठीप्रेमींच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात बाबूदाद कोमारपंत, उमेश प्रभुदेसाई बोरुस्कर, दिलखुश शेट, जितेंद्र आमशेकर, स्वप्निल गावकर, गोविंद कोमारपंत, संदीप पागी, साबाजी नाईक आणि किसन देसाई आदींचा समावेश होता.

यावेळी आगामी विधानसभा अधिवेशनात मराठी राजभाषेसाठी कायदादुरुस्तीचा ठराव घेण्याची मागणी करण्यात आली.

मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Trending

Exit mobile version