गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल, पुसापती अशोक गजपती राजू यांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने गोव्यातील जनतेला, विशेषतः मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “ईद-ए-मिलाद, ज्याला मिलाद-उन-नबी असेही म्हणतात, हा दिवस पैगंबर मुहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. प्रेम, बंधुत्व, समानता आणि मानवतेच्या सेवेचा त्यांचा कालातीत संदेश आजही आपल्या काळात अत्यंत महत्वपूर्ण आहे.”
“या पवित्र प्रसंगी, परस्पर आदर, सामंजस्य आणि करुणा यांवर आधारित समाज उभारण्याच्या आपल्या वचनबद्धतेकडे आपण पुर्नसमर्पित होऊया आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करूया”.
परमेश्वराचा आशिर्वाद प्रत्येक कुटुंबाला शांतता, सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. तसेच हा शुभप्रसंग गोव्यात आणि आपल्या संपूर्ण राष्ट्रात बंधुत्वाचे आणि सलोख्याचे बंध अधिक दृढ करो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.