गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना ओणम सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल, पुसापती अशोक गजपती राजू यांनी ओणमच्या निमित्ताने गोव्यातील लोकांना आणि विशेषतः गोव्यात व जगभरात राहणाऱ्या केरळ बांधवाना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात,“ओणम सण हा समृद्धी, सलोखा, एकता आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव आहे. हा सण राजा महाबली (मावेली) यांच्या पौराणिक राजवटीचे स्मरणार्थ साजरा केला जातो ज्यांचे राज्य समानता, न्याय, करुणा आणि विपुलतेने भरलेले सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते. त्यांच्या राजवटीशी निगडित कालातीत आदर्श मुल्ये आपल्याला परस्पर आदर, प्रतिष्ठा आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहतात.”

 “रंगीत पूक्कलमपासून ते पारंपरिक  ओणसाद्यापर्यंतच्या ओणमच्या सुंदर परंपरा आनंद, कृतज्ञता आणि एकतेच्या भावनेचे प्रतिक आहे. उत्सवाच्या वैभवापलीकडे ओणम आपल्याला आठवण करून देतो की जीवनाचा खरा अर्थ एकमेकामध्ये आनंद वाटून घेण्यात, एकमेकांची काळजी घेण्यात आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत समृद्धी पोहोचेल याची खात्री देणे याच्यात आहे. ओणमचा उत्साह प्रत्येक घरात आनंद, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो आणि एकता, मित्रता व बंधुत्वाचे बंध अधिक दृढ करण्याची प्रेरणा देवो. हा आनंदमय सण आपल्या जीवनात नवी आशा आणि सलोखा घेऊन येवो आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच ‘जग एक कुटुंब आहे’ या भावनेला अधिक समृद्ध करो  असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version