गोवा खबर

इन्फ्लूएंझा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७३ झाली

Published

on

Spread the love

गोवा खबर:आरोग्य सेवा संचालनालयाने पावसाळ्यातील श्वसनमार्गाच्या संसर्गाच्या हंगामी स्वरूपानुसार गेल्या काही आठवड्यांत राज्यात इन्फ्लूएन्झाच्या (फ्लूएन्झाचा) प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. देखरेख डेटानुसार जुलै आणि ऑगस्ट २००६ पर्यंत इन्फ्लूएन्झाच्या पॉझिटिव्हिटीमध्ये किंचित वाढ झाली होती असे आरोग्य सेवा संचालनालयाने कळविले आहे.

देखरेख डेटा नुसार, इन्फ्लूएंझा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जूनमध्ये ६ होती आता जुलैमध्ये ४४ पर्यंत वाढली आणि २० ऑगस्ट २०२६ पर्यंत ही संख्या ७३ झाली आहे.

 आरोग्य सेवा संचालनालयाने जनतेला खालील आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे: खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमालाने झाकावे, श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे जाणवत असल्यास मास्क वापरावा आणि इतरांशी जवळचा संपर्क टाळावा,  साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवावेत किंवा अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरचा वापर करावा, न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे,  विशेषतः प्रकृती बरी नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

ताप, खोकला, घसादुखी किंवा श्वसनसंस्थेशी संबंधित इतर लक्षणे जाणवत असल्यास इतरांशी संपर्क टाळा, लक्षणे गंभीर, दीर्घकाळ टिकणारी किंवा वाढत असल्यास, विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि आधीपासूनच वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये वैद्यकीय सल्ला घ्या आणि चाचणी व उपचारांबाबत वैद्यकीय सल्ल्याचे पालन करा व स्वतःहून औषधोपचार करणे टाळा.

नियमित इन्फ्लूएंझा देखरेखीचा भाग म्हणून या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. जनतेला घाबरून न जाण्याचा, सतर्क राहण्याचा आणि श्वसनमार्गाच्या संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी संसर्ग प्रतिबंधक उपायांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Trending

Exit mobile version