गोवा खबर

पणजी ते गणपतपुळे (रिटर्न) कदंब सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर: गणेश चतुर्थी महिन्यावर येऊन ठेपलेली असतानाच गोव्याच्या कदंब परिवहन महामंडळानं पणजी ते गणपतपुळे अशा नव्या बससेवेचा श्रीगणेश केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यात समुद्राच्या काठावर वसलेलं एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ… साधारण ४०० वर्षांपूर्वी इथं पांढऱ्या वाळूत गणेशाची मूर्ती प्रकटली. नैसर्गिक पद्धतीनं प्रकट झाल्यानं त्याला स्वयंभू गणेश म्हणून मान्यता मिळालीये.

याच ठिकाणी गोव्यातून असंख्य भाविक दर्शनासाठी जात असतात. हीच बाब लक्षात घेऊन कदंब परिवहन महामंडळानं पणजी ते गणपतीपुळे आंतरराज्य बससेवेचा शुभारंभ केलाय. शुक्रवारी पणजी येथील महामंडळाच्या बसस्थानकावर झालेल्या शुभारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, कदंबा परिवहान महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

ही बस पणजीहून दुपारी १.१५ वाजता सुटेल आणि पुढे पर्वरी–म्हापसा–करासवाडा चार रस्ता–कोलवाळ–धारगळ–पेडणे–तोरसे बांदा–सावंतवाडी–कुडाळ–ओरोस–कासाळ–कणकवली–नांदगाव–तळेरे–खारेपाटण–राजापूर–ओणी–वाटूळ–लांजा–पाली आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडून गणपतपुळेत पोहोचेल. (text only दाखवणे)

परतीच्या प्रवासात बस गणपतीपुळेहून पूर्णगडमार्गे गोव्याच्या दिशेने येणार आहे. गणपतीपुळेहून सकाळी ७.१० वाजता बस सुटणार आहे. धामणसे फाटा, जाकादेवी, करबडे फाटा, हातखंबा, रत्नागिरी, पावस, कळशी, आडिवरे, धारतळे, सालगाव, राजापूर, खारेपाटण, तळेरे आणि कणकवली या मार्गावरून ही बस पुढे गोव्याच्या दिशेने रवाना होईल. नव्या आंतरराज्य बससेवेमुळे गोवा आणि कोकणातील नागरिकांना गणपतीपुळे, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये थेट आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

गोव्याहून जाणाऱ्या बसच्या वेळा

पणजीहून बस दुपारी १.१५ वाजता सुटणार असून म्हापसा येथे १.४०, पेडणे येथे २.१५, बांदा २.४५, सावंतवाडी ३.३०, कुडाळ ४.००, ओरोस ४.२०, कासाळ ४.३०, कणकवली ५.००, नांदगाव ५.२०, तळेरे ५.३०, खारेपाटण ५.४५, राजापूर ७.००, ओणी ७.२०, वाटूळ ७.३०, लांजा ८.००, पाली ८.०५, रत्नागिरी रेल्वे स्थानक ८.१५ आणि रत्नागिरी येथे रात्री ८.३० वाजता पोहोचणार आहे.

Trending

Exit mobile version