गोवा खबर

मंत्री सुभाष फळदेसाई यांचा 60 वा वाढदिवस गुरुवारी सांगेत साजरा होणार

Published

on

Spread the love


गोवा खबर: गोवा सरकारचे समाजकल्याण, पिण्याचे पाणी, दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण आणि नदी परिवहन मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांचा 60 वा वाढदिवस गुरुवार, 20 ऑगस्ट 2026 रोजी सांगे येथे साजरा करण्यात येणार आहे.

या वाढदिवसानिमित्त सांगे नगरपालिका सभागृहात सायंकाळी 6 वाजल्यापासून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सांगे मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिक, कार्यकर्ते आणि शुभचिंतकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुभाष फळदेसाई यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे आयोजकांनी ‘Presents in Blessings Only’ असा संदेश देत भेटवस्तूंऐवजी केवळ शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन केले आहे.

मंत्री सुभाष फळदेसाई हे सध्या गोवा सरकारमध्ये समाजकल्याण, पिण्याचे पाणी, दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण आणि नदी परिवहन ही खाती सांभाळत असून ते सांगे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात

Trending

Exit mobile version